


आपली माणसं !!! आपली भाषा !!!
आपली ही संस्था मिल्वॉकी मधील मराठी भाषिकांना एकत्र आणून मराठी भाषा आणि संस्कृती जतन आणि वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करते.
अमेरिकेत वाढणाऱ्या आपल्या नवीन पिढीला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्या मातृभाषेत बोलण्यासाठी उदयुक्त करते.
लहानमोठ्या सर्वांसाठी नवीन ओळखी करून घेण्याची, आपल्यातील कलागुण आपल्या मित्रमंडळींसमोर सादर करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देतं हे आपलं महाराष्ट्र मंडळ !!!
This is a community organization, formed by people of Indian origin from Indian state of Maharashtra. Our organization endeavors to preserve, flourish and expand Indian values in Milwaukee, WI.We strive to introduce our younger generation to their roots.
*BMM 2025 CLEVELAND Maitree Melava* announces North America Talent Show! 1st/2nd/3rd generations welcome! Send entries at https://forms.gle/bgQ2uyyJrHTALEwK9 before March 31.

नमस्कार मंडळी,
ईस्ट बे मराठी मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त गुढीपाडव्याचे पवित्र औचित्य साधून आपल्या मराठी परिवारासाठी आम्ही एक प्रभावी सत्र घेऊन येत आहोत.
"बोध मनाचा प्रवास उत्कर्षाचा!"
आपल्याकडे असलेल्या मनाच्या सामर्थ्याचा उपयोग करून आपल्या जीवनात सर्वांगीण यश आणि सर्व क्षेत्रांत उत्कर्ष कसा साधता येईल, हे या सत्रात आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला लाभले आहेत आंतरराष्ट्रीय किर्तीचे वक्ते, अध्यात्मिक प्रवर्तक, आणि 'जीवनविद्या मिशन' Jeevanvidya Mission चे आजीव विश्वस्त आदरणीय श्री. प्रल्हाद वामनराव पै!
Please join the Facebook event and select "Going"! This way, you will get all the updates, zoom link (if you want to join on zoom and ask your questions directly) about the event.
It's a Free East Bay Marathi Mandal (EBMM) Webinar "बोध मनाचा प्रवास उत्कर्षाचा!" by आदरणीय श्री. प्रल्हाद वामनराव पै!
Here is the FB event link - https://fb.me/e/4BffTs1Vk
बे एरियामध्ये संपन्न झालेल्या बृहन महाराष्ट्र अधिवेशनात तुमच्या पैकी काहींना 'सुखाचा password' यावरील त्यांचे वक्तव्य ऐकण्याची संधी मिळाली असेल. यावेळी या सर्वांगीण उपयुक्त माहितीचा लाभ आपण घरच्या घरी घेऊ शकणार आहात. एप्रिल ६ रोजी झूम लिंकची माहिती पाठवली जाईल.
एप्रिल ६ रोजी ठीक रात्री ८:३० वाजता झूम द्वारे सकारात्मक, सहकारात्मक आणि सर्वसमावेशक विचारसरणीचा स्वीकार करून आपल्या जीवनात शांती आणि समाधान कसे नांदवायचे, हे तंत्र शिकण्यासाठी EBMM च्या या विशेष सत्रात जरूर सहभागी व्हा आणि श्री. प्रल्हाद दादांशी संवाद साधण्याची ही नामी संधी दवडू नका!


नमस्कार मंडळी
आज भागवत एकादशीच्या शुभमुहूर्तावर बृहन्महाराष्ट्र मंडळ (समाजरंग) घेऊन येत आहे *परदेशातील वारी पंढरीची!!!*
जून-जुलै महिन्यात होणाऱ्या या वारीच्या निमित्ताने “समाजरंग”तर्फे आम्ही एक सामाजिक बांधिलकीचा प्रस्ताव घेऊन येत आहोत.
यानुसार सहभागी होणारे मंडळ एखादी सामाजिक संस्था निवडून त्यांच्यासाठी निधीसंकलन करू शकते.
जर कुणी कमीत कमी $५० डॉलरची ऐच्छिक देणगी दिली, तर त्यांना एक टी-शर्ट तसेच विठोबा रुक्मिणीचे चित्र असलेले (३ इंचाचे) पदक मिळेल. या टी-शर्टवर बृहन्महाराष्ट्र मंडळाचे, तसेच तुमच्या मंडळाचे मानचिन्ह (लोगो) असेल.
*कृपया अधिक माहितीसाठी सोबत जोडलेले पत्रक वाचा.*
"समाजरंग" गटाचे स्वयंसेवक पुढील काही दिवसात तुम्हाला संपर्क साधतील.
तुम्हाला जर अधिक प्रश्न असतील तर मला खाजगीत विचारा.
जर बरेच प्रश्न आले तर मी एक बैठक आयोजित करेन.
मी आणि "समाजरंग" चे स्वयंसेवक आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहोत.
धन्यवाद!!! 🙏
BMM Zoom is inviting you to a scheduled Zoom meeting.
BMM अर्थ मंथन
Weekly Session
Time: Sunday March 30, 7 pm ET/ 4 PM PT
Join Zoom Meeting
Meeting ID: 933 6791 7666Passcode: 123456

आनंद रामायणातील सीता काय म्हणते?
वाल्मिकी रामायण सर्वांनाच परिचयाचं आहे. पण मध्ययुगात लिहिलेले आनंद रामायण आपल्यातील किती लोकांना माहीत आहे? जिथे वाल्मिकी रामायण संपते तिथे आनंद रामायणाची कथा सुरु होते.वाल्मिकी रामायणातील सीतेने ठेवलेला संयम आणि सांभाळलेली रामाची प्रतिष्ठा ह्या मुळे कधी कधी आजच्या काळात ती आपल्याला पडलेले एक कोडं वाटते. पण मध्य युगात लिहिलेल्या आनंद रामायणातील सीता वेगळी आहे. ती बुद्धिमान, चतुर आणि विचारशील विदुषी आहे.
डॉ. विद्युल्लेखा अकलूजकर ह्यांनी आनंद रामायणाचा अनेक वर्ष सखोल अभ्यास केला आहे. त्या आनंद रामायणातील सीता कशी आहे, ती तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या प्रसंगी काय म्हणते, कशी वागते आणि त्यातून तिचे विचार, तिची प्रगल्भ बुद्धिमत्ता, तिचे रामावरचे प्रेम कसे दिसते हे आपल्याला सांगणार आहेत. विद्युत ताईंच्या रसाळ भाषेत हे सर्व ऐकून आपल्या सर्वांनाच साधारण इ.स.१५०० मध्ये लिहिलेल्या आनंद रामायणातील सीता २१व्या आधुनिक शतकातही पुरोगामी, ज्यास्त जवळची आणि आदरणीय वाटेल.
हे एक वेगळ्याच विषयावरचे विचार करायला लावणारे व्याख्यान पाहण्यासाठी जरूर या एप्रिल ५, २०२५ रोजी ३:०० वाजता. (EST)